'हिंदुस्थान' या विषयावरील सावरकरांचे निवडक विचार त्यांच्याच शब्दांत संदर्भासहित येथे दिलेले आहेत.आपल्या देशाचे प्राचीन नाव - सप्तसिंधू वा सिंधू आपल्या देशाचे सर्वात प्राचीन नाव, ज्याविषयी आपणापाशी आधार आहे, ते सप्तसिंधू वा सिंधू आहे. भारतवर्ष हे नावसुध्दा नंतरचे अभिधान आहे. आणि त्याचे आवाहन व्यक्तिविषयक आहे. मनुष्य कितीही महान् असो, जसजसा काळ जातो तसतसा त्याचा गौरव कमी कमी होत जातो. - (१९२३ हिं., स.सा.वा. ६ : १९)
सिंधू शब्दाने देशाच्या सीमांचा बोध
संस्कृतमधील सिंधू शब्दाने सिंधू नदीचाच नव्हे तर ..