स्वातंत्र्य

स्वातंत्र्य

‘स्वातंत्र्य’या विषयावरील सावरकरांचे निवडक विचार त्यांच्याच शब्दांत संदर्भासहित येथे दिलेले आहेत.स्वातंत्र्यास्तव मरण - अमरत्वाचे साधन मृत्यूचा पाश कोणाला तोडावयाचा आहे का? काळाइतकेच अमर्याद अमरत्व कोणास पाहिजे आहे काय? असेल तर एक उपाय म्हणजे स्वदेशस्वातंत्र्याच्या रणांगणात त्याने हरहर म्हणावा! कधीही मरण न येण्याचे एक साधन म्हणजे स्वदेशस्वातंत्र्यास्तव तत्काळ मरण हे होय! - (१९०८ लं.बा., स.सा.वा. ४ : ८६)..