दिनांक: १५ जानेवारी १९६०
स्थान: स.प. महाविद्यालयाचे पटांगण, पुणे
मृत्युंजय दिन : क्रांतिकारक सावरकरांना काळ्यापाण्याच्या दोन शिक्षा सुनावण्यात आल्या होत्या. एकूण पन्नास वर्षांची ही शिक्षा दि. २४ डिसें १९१० ला सुरु झाली. म्हणजे सावरकरांची शिक्षा दि. २३ डिसें १९६० ला पूर्ण झाली असती. काळ्यापाण्याची शिक्षा म्हणजे साक्षात् मृत्युलाच दिलेले आव्हान होते. सावरकरांनी तो ठरलेला मुक्तिदिन पाहिला, म्हणजेच त्यांनी मृत्युवर विजय मिळविला. हाच तो मृत्युंजय दिन.