पंजाब प्रातीय हिंदू परिषद, वार्षिक अधिवेशन, ल्यालपूर, ३० एप्रिल १९४३
   

पंजाब प्रातीय हिंदू परिषदेचे ३० एप्रिल १९४३ ला ल्यालपूरला सुशोभित मंडपात थाटात उद्घाटन झाले. ल्यालपूर स्थानकात आगगाडी पोहोचल्यापासून सुरू झालेली मिरवणूक निर्वाचित अध्यक्ष डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जींच्या जयजयकारात परिषद स्थळी पोहोचली.  १२ बैलांद्वारे मार्गक्रमण करणारा, भव्य सुसज्जित, प्राचीन हिंदू परंपरेनुरूप निर्मित रथात विराजमान श्यामाप्रसाद मुखर्जींना घेऊन जाणारी मिरवणूक जवळजवळ मैलभर लांब पसरली होती. किमान ३०००० जनता मिरवणूकीत सहभागी होती. राजा नरेंद्रनाथांनी परिषदेचे उद्घाटन केले. डॉ. मुंजेंनी हर्षभरित सभेत चितोर गडावर मध्यभागी हिंदूसभेचा ध्वज फडकावला. डॉ. मुखर्जींनी अध्यक्षीय भाषणात भारताच्या फाळणीला कडाकडून विरोध केला व ह्या संघर्षमय व युध्दमान स्थितीतून स्वातंत्र्य, न्याय व समेतेवर आधारित नवविश्वाची निर्मिती होईल अशी आशा व्यक्त केली. डॉ. बा. शि. मुंजे, राय बहाद्दुर मेहरचंद, सर गोकुलचंद नारंग, राजा नरेंद्रनाथ व श्री गोस्वामी गणेश दत्त हे इतर प्रमुख नेते व्यासपीठावर उपस्थित होते. मंडपाबाहेर 'अखंड हिंदुस्थान'चे भव्य मानचित्र लावलेले होते. ३ मे १९४३ ला परिषदेचा समारोप झाला.

डॉ. बा. शि. मुंजे व डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी, प्रभावी अध्यक्षीय मिरवणूक, ध्वजारोहण व ल्यालपूर हिंदूसभा परिषदेची कार्यव्रुत्ताची दुर्मिळ चलतचित्रे पाहण्यासाठी खालील दुव्यावर टिचकी मारा.

सौजन्यः साम्राज्य युध्द संग्रहालय (Courtesy: Imperial War Museum, London)