हिंदु नृसिंह

हिंदु नृसिंह

हे हिंदुशक्ति-संभूत-दीप्ततम-तेजा हे हिंदुतपस्या-पूत ईश्वरी ओजा हे हिंदु-सौभाग्य-भूतिच्या-साजा हे हिंदु नृसिंहा प्रभो शिवाजीराजा करि हिंदुराष्ट्र हे तूंते। वंदना करि अंतःकरण तुज अभि-नंदना तव चरणिं भक्तिच्या चर्ची चंदना गूढाशा पुरवी त्या न कथूं शकतों ज्या हे हिंदुनृसिंहा प्रभो शिवाजीराजा । हा भग्न तट असे गडागडाचा आजी हा भग्न आज जयदु्र्गं आंसवांमाजी ..