सागरास

सागरास

ने मजसी ने परत मातृभूमीला । सागरा, प्राण तळमळला भूमातेच्या चरणतला तुज धूतां । मी नित्य पाहिला होता मज वदलासी अन्य देशिं चल जाऊ । सृष्टिची विविधता पाहू तइं जननी-हृद् विरहशंकितहि झालें । परि तुवां वचन तिज दिधलें मार्गज्ञ स्वयें मीच पृष्टि वाहीन । त्वरित या परत आणीन विश्वसलो या तव वचनी । मी जगदनुभव-योगे बनुनी । मी तव अधिक शक्त उध्दरणी । मी येइन त्वरें कथुन सोडिलें तिजला । सागरा, प्राण तळमळला शुक पंजरिं वा हरिण शिरावा पाशीं । ही फसगत झाली तैशी भूविरह कसा सतत साहु यापुढती । दशदिशा तमोमय होती ..