मनुष्याच्या शरीरात खोल रूतून बसलेली किंवा बाहेरच्या स्थूल दृष्टीला न दिसता आतच बळावून आतून जीवन पोखरीत असलेली जीवनघातक बाह्य द्रव्ये वा आंतर रोगाणूंचे घाव जसे ‘क्ष’ किरणांच्या— एक्स रेज् च्या – अंतर्भेदी प्रकाशाने यथावत निरीक्षता येतात, तसेच समाजाच्या शरीरात खोल रूतून बसलेल्या सामाजिक दोषांचे अस्तित्व, स्वरूप नि परिणाम नुसत्या तात्विक विवेचनापेक्षा त्या दोषांमुळे समाजाला जी दुःखे व्यक्तिशः भोगावी लागतात त्या फुटकळ, वैयक्तिक नि डोळ्यांसमोर घडणारया दृश्यांच्या उजेडातच मनावर पक्केपणी ठसू शकतात, मनाला ..