साहित्य

आत्मबल

अनादि मी अनंत मी, अवध्य मी भला मारिल रिपु जगतिं असा कवण जन्मला ।। धृ ।। अट्टाहास करित जईं धर्मधारणीं मृत्युसीच गाठ घालु मी घुसे रणीं अग्नि जाळि मजसी ना खड्ग छेदितो भिउनि मला भ्याड मृत्यु पळत सूटतो खुळा रिपू । तया स्वयें ..

सागरास

ने मजसी ने परत मातृभूमीला । सागरा, प्राण तळमळला भूमातेच्या चरणतला तुज धूतां । मी नित्य पाहिला होता मज वदलासी अन्य देशिं चल जाऊ । सृष्टिची विविधता पाहू तइं जननी-हृद् विरहशंकितहि झालें । परि तुवां वचन तिज दिधलें मार्गज्ञ स्वयें मीच पृष्टि वाहीन । त्वरित या परत आणीन विश्वसलो या तव वचनी । मी जगदनुभव-योगे बनुनी । मी तव अधिक शक्त उध्दरणी । मी येइन त्वरें कथुन सोडिलें तिजला । सागरा, प्राण तळमळला शुक पंजरिं वा हरिण शिरावा पाशीं । ही फसगत झाली तैशी भूविरह कसा सतत साहु यापुढती । दशदिशा तमोमय होती ..

हिंदु नृसिंह

हे हिंदुशक्ति-संभूत-दीप्ततम-तेजा हे हिंदुतपस्या-पूत ईश्वरी ओजा हे हिंदु-सौभाग्य-भूतिच्या-साजा हे हिंदु नृसिंहा प्रभो शिवाजीराजा करि हिंदुराष्ट्र हे तूंते। वंदना करि अंतःकरण तुज अभि-नंदना तव चरणिं भक्तिच्या चर्ची चंदना गूढाशा पुरवी त्या न कथूं शकतों ज्या हे हिंदुनृसिंहा प्रभो शिवाजीराजा । हा भग्न तट असे गडागडाचा आजी हा भग्न आज जयदु्र्गं आंसवांमाजी ..

‘ने मजसी ने’ – एक भावदर्शन

‘ने मजसी ने’ या सुप्रसिद्ध कवितेचे येथे दिलेले विवरण पुण्याचे स्वामी माधवानंद यांनी केले आहे :“मोठया गौरवाने गावं असं हे गीत आपण अनेकदा ऐकलं आहे. त्याच्या शब्दांतून जी वेदना प्रगट होते ती जाणून घेऊन ते शब्द ऐकले पाहिजेत. असं झालेलं नाही, की सावरकर सहज साईट सिइंगला ब्रायटनच्या समुद्रतीरी गेले आणि एकदम त्यानां गीत स्फुरलं वेदनदेखील कशामुळे होती ती परिस्थिती कळली पाहिजे की काय घडत आलं होतं आणि काय मोडत होतं !..