आपल्या भारतीय महाराज्याच्या घटना समितीने नि लोकसभेने अस्पृश्यतेला दंडनीय अपराध ठरविण्याची जी घोषणा नि जो निर्बंध केला आहे त्याचे महत्त्वमापन आम्ही या लेखाच्या पूर्वार्धात केले. आता दैनंदिन व्यवहारात त्या निर्बंधाच्या प्रत्यक्ष बजावणीचे कार्य कसे पार पाडता येईल याची चर्चा करू.
शतकानुशतके समाजाच्या वरच्या थरापासून खालच्या थरापर्यंत धर्माचार म्हणून रोमरोमात भिनून राहिलेल्या अस्पृश्यतेसारख्या रुढीला अकस्मात दंडनीय ठरविणारा हा असला निर्बंध जोवर केवळ निर्बंधसंहितेतच अंकिलेला राहतो तोवर तो तत्त्वत: कितीही ..